आयपीएल २०२१मध्ये आज (२९ एप्रिल) दोन सामने खेळले जात आहेत. पहिल्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्याने संघात केलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयीही सांगितले. या निर्णयानंतर नेटिझन्सनी रोहितबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने युवा फलंदाज ईशान किशनला संघातून वगळले. रोहितच्या या निर्णयावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. ईशान किशनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलला संघात संधी देण्यात आली आहे. ट्विटरवरील लोकांनी रोहितला या निर्णयावर अनेक प्रश्न विचारले आहेत.

ईशान किशनला वगळल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया:

 

 

 

 

 

यंदाच्या आयपीएलमध्ये ईशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती, मात्र, तो मोठी खेळी करण्यात अपयशी होत आहे. किशनने चेन्नईतील सर्व ५ सामन्यांमध्ये भाग घेतला होता. यात त्याने केवळ ७३ धावा केल्या. मागील हंगामात मुंबईच्या विजयात ईशान किशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक ३० षटकार ठोकले आणि मुंबईसाठी सर्वाधिक ५१६ धावा केल्या. रोहित शर्माच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.