राजस्थान रॉयल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला, त्या ९ मेच्या रात्री क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण रात्रभर जागे होते, असे पंचतारांकित हॉटेलच्या सीसीटीव्हीतील चित्रिकरणातून स्पष्ट झाले आहे. हे दोघेही रात्री सातत्याने त्यांच्या खोलीबाहेर पडत होते आणि व्हरांड्यात बुकी जिजू जनार्दन यांच्याशी बोलत होते, हेदेखील सीसीटीव्ही कॅमेऱयात बंदिस्त झाले आहे. 
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी १६ मेला श्रीशांत, चव्हाण आणि अजित चंडिला या तीन क्रिकेटपटूंना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर या चित्रिकरणाला महत्त्व आहे. त्या रात्री स्पॉट फिक्सिंगच्याच आरोपावरून अटक केलेल्या जिजू जर्नादन याच्यासोबत श्रीशांत आणि चव्हाण दोघेही खोलीबाहेरील व्हरांड्यात बोलत असल्याचे दिसते. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या मुलीही या क्रिकेटपटूंबरोबर दिसल्या आहेत. नऊ मे रोजी रात्री सव्वादहा वाजल्यापासून दहा मेच्या पहाटेपर्यंत हे दोन्ही क्रिकेटपटू सातत्याने व्हरांड्यात येत होते, असे चित्रिकरणावरून दिसते.

या व्हिडिओमध्ये श्रीशांत जिजू जर्नादन (लाल टी-शर्ट) याच्याशी बोलत असल्याचे दिसते. त्याच्यासोबत अंकित चव्हाणही दिसत आहे.

पुन्हा एकदा श्रीशांत खोलीबाहेर व्हरांड्यात फिरताना दिसतो आहे. अंकित चव्हाणकडून त्याने एक बॅ्ग घेतल्याचेही यामध्ये दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओमध्ये श्रीशांत एका महिलेबरोबर बोलताना दिसतो आहे.