Iran VS Israel War : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी विकोपाला गेला आहे. इस्रायल-इराणमधील संघर्षात मोठी जीवितहानी होत आहे. या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत २२ जून रोजी इराणवर मोठे हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने संताप व्यक्त करत थेट अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ला केल्यानंतर आज इस्रायलने (२३ जून) पुन्हा इराणवर मोठे हल्ले केले आहेत. इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगासह आणखी काही ठिकाणी भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक परिसरही उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्याच्या विध्वंसाचे व्हिडीओ समोर आले आहेत. या संदर्भातील वृत्त इराणी सरकारी टीव्हीने दिलेल्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, तेहरानजवळ सोमवारी दुपारी तीव्र इस्रायली हवाई हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगाच्या गेटवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आजच्या या हल्ल्यात काही जीवितहानी झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एविन तुरुंग हे पाश्चात्य कैद्यांना ठेवण्यासाठी ओळखलं जाणारं कुप्रसिद्ध तुरुंग आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून इस्रायली हल्ले तेहरानमधील इराणी सरकारी ठिकाणांना लक्ष्य केल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. तसेच यामध्ये एविन तुरुंगाचाही समावेश होता. एविन तुरुंगात कैदी आणि पाश्चात्य संबंध असलेल्या व्यक्तींना रेव्होल्यूशनरी गार्डद्वारे चालवल्या जाणाऱ्या युनिट्समध्ये ठेवले जाते. या तुरुंगातील हालचालीची माहिती इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अहवालाद्वारे दिली जाते.
‼️‼️‼️ Big – The Israeli Air Force is bombing the headquarters of the Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) in Tehran.
The Israel Defense Forces confirm that many high-ranking officials of the IRGC have been killed in the strikes. pic.twitter.com/XeWY2InrsRThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Visioner (@visionergeo) June 23, 2025
इराणच्या न्यायव्यवस्थेच्या मिझान वृत्तसंस्थेने एविन तुरुंगावर इस्रायली हल्ल्याची पुष्टी करत सांगितलं की या हल्ल्यात तुरुंगाचे नुकसान झाले आहे, पण परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार, इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या टार्गेटमध्ये कारजमधील निमलष्करी रक्षकांचे सुरक्षा मुख्यालय, शहरातील पॅलेस्टाईन स्क्वेअर आणि निमलष्करी कॉर्प्स इमारतीला लक्ष्य करण्यात आलं होतं. तसेच या हल्ल्यामुळे तेहरानमधील वीजपुरवठा यंत्रणेवर परिणाम झाला असून वीजपुरवठा खंडित झाला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.