Israel Iran Breaking News Updates इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटे इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ला करत इराणला कठोर इशारा दिला आहे. दरम्यान, इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्र डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. पाठोपाठ कच्चं तेल व वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’ची (सामुद्रधुनी) नाकेबंदी करण्याच्या निर्णयाला इराणच्या कायदेमंडळाने मान्यता दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीवर सोपवण्यात आल्याचं वृत्त इराणच्या प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही सुरुवात तुम्ही केलीत आता शेवट आम्ही करु असा इशारा दिला आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

Live Updates

US Israel Iran News Live Updates, 23 June 2025 : इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याचे गंभीर परिणाम काय? यासह महत्त्वाच्या घडामोडी

20:07 (IST) 23 Jun 2025

Iran VS Israel War : इराणने रशियाला मागितला पाठिंबा? अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खामेनींचं पुतिन यांना पत्र; रशिया काय भूमिका घेणार?

मंत्री अब्बास अराघची यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पत्र देत पुतिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...अधिक वाचा
19:03 (IST) 23 Jun 2025

Iran Vs Israel War : इस्रायलचा इराणच्या एविन तुरुंगावर भीषण हल्ला, अनेक ठिकाणे उद्ध्वस्त; हल्ल्याचा VIDEO समोर

तेहरानजवळ सोमवारी दुपारी तीव्र इस्रायली हवाई हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगाच्या गेटवर भीषण हल्ला केला. ...वाचा सविस्तर
18:16 (IST) 23 Jun 2025

इस्रायने इराणच्या एविन तुरुंगासह इतर अनेक ठिकाणी हल्ला केला

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या संघर्षात अमेरिकेनेही एन्ट्री केली आहे. २२ जून रोजी अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले करत इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा केला आहे. यानंतर आता इस्रायने इराणच्या एविन तुरुंगासह इतर अनेक ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

17:25 (IST) 23 Jun 2025

Iran VS Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलचा इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर मोठा हल्ला, दोन्ही देशांतील संघर्ष वाढला

Iran VS Israel War : इस्रायलने इराणच्या फोर्डो या अणुकेंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. ...सविस्तर वाचा
16:34 (IST) 23 Jun 2025

US Airstrikes Iran : अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी वापरली 'ही' खास रणनीती; इराणला हल्ल्याची साधी भणकही का लागली नाही?

अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करताना नेमकं कशाचा वापर केला? अमेरिकेने या हल्ल्यासाठी काही खास रणनीती वापरली का? महत्वाची माहिती समोर आली आहे. ...वाचा सविस्तर
13:19 (IST) 23 Jun 2025

पाकिस्तानला चूक उमगली? ट्रम्प यांची नोबेलसाठी शिफारस करणाऱ्या सरकारकडे देशातील नेतेमंडळींची 'ही' मागणी!

Nobel peace prize for Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची नोबेलसाठी शिफारस केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये शिफारस मागे घेण्यासंदर्भात चर्चा होऊ लागली आहे. ...सविस्तर बातमी
12:24 (IST) 23 Jun 2025

इस्रायलच्या अगतिकतेमुळेच अमेरिकेकडून इराण कारवाईची घाई? इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांसमोर इस्रायल हतबल?

इराणमधून सातत्यपूर्ण क्षेपणास्त्रे डागली जात असल्यामुळे इस्रायलच्या बचाव प्रणालीची दमछाक होत असून ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलकडे आता जास्तीत जास्त १२ दिवस तग धरू शकेल, एवढाच क्षेपणास्त्र साठा बाकी आहे. ...सविस्तर वाचा
12:14 (IST) 23 Jun 2025

इराणमधल्या सहा ठिकाणांवर हल्ला करुन ती उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा

इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष सुरुच आहे. आता इस्रायलच्या IEDF ने दावा केला आहे की त्यांनी पश्चिम, पूर्व आणि मध्य इराण भागात सहा इराणी सैन्य तळांवर आणि हवाई तळांवर हल्ला केला आहे. इराणची १५ विमानं आणि हेलिकॉप्टर्स आम्ही उद्ध्वस्त केली आहेत असा दावा इस्रायलने केला आहे.

12:10 (IST) 23 Jun 2025

Israel Iran War: इराणवरील हल्ल्यासाठी भारतानं अमेरिकेला मदत केल्याचे दावे; भारत नेमका कुणाच्या बाजूने? वाचा दाव्यांमागील सत्य!

Israel Iran War Updates: ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या माध्यमातून इराणवर हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेनं भारताची हवाई हद्द वापरल्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...अधिक वाचा
12:10 (IST) 23 Jun 2025

Stock Market Today : कच्च्या तेलाच्या किमती पाच महिन्यातील उच्चांकावर, भारतीय शेअर बाजार गडगडला

Sensex Today Updates : इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर दोन टक्क्यांनी वाढून गेल्या पाच महिन्यांमधील उच्चांकावर पोहोचले आहेत. ...सविस्तर वाचा
12:10 (IST) 23 Jun 2025

इराण 'होर्मुझ’चा जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत! भारतावर काय परिणाम होईल?

Iran moves to block Strait of Hormuz : अनेक तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की इराण इतकं टोकाचं पाऊल (होर्मुझ जलमार्ग बंद करणे) उचलणार नाही. मात्र, आता इराणने त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. ...सविस्तर बातमी
11:09 (IST) 23 Jun 2025

इराणच्या आण्विक तळांचं मोठं नुकसान-डोनाल्ड ट्रम्प

इराणच्या आण्वित तळांवर आम्ही हल्ला केला त्यानंतर इराणचे आण्वित तळ उद्ध्वस्त झाले आहेत. उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंवरुन हे कळतं आहे. सर्वात जास्त नुकसान जमिनीच्या खोल भागांमध्ये झालं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

11:06 (IST) 23 Jun 2025

इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा उत्तर कोरियाने नोंदवला निषेध

इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा उत्तर कोरियाने निषेध नोंदवला आहे. अमेरिकेने ही इराणवर हल्ला करुन चूक केली आहे. सुरक्षा हितांचं उल्लंघन अमेरिकेने केलं आहे असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.

10:34 (IST) 23 Jun 2025

इराणला आण्विक सहकार्य करण्यासाठी अनेक देशांची तयारी, पुतिन यांचा दावा नेमका काय?

इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान यानंतर रशियाने इराणला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणला आण्विक सहकार्यासाठी रशियासह अनेक देश तयार आहेत असं व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला युद्धात ढकलू पाहात आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे.

Israel Iran Attacks Live Updates in Marathi

इस्रायल-इराणमधील संघर्ष लाईव्ह अपडेट्स

इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटे इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ला करत इराणला कठोर इशारा दिला आहे. दरम्यान, इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्र डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. पाठोपाठ कच्चं तेल व वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’ची (सामुद्रधुनी) नाकेबंदी करण्याच्या निर्णयाला इराणच्या कायदेमंडळाने मान्यता दिली आहे.