Benjamin Netanyahu on Attack on Israel: शनिवारी सकाळी इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेनं केलेल्या हल्ल्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. प्रादेशिक प्रभुत्वाच्या मुद्द्यावरून पॅलेस्टाईनच्या धर्तीवरून सातत्याने इस्रायलविरोधातल्या कारवाया होत असल्याचं याआधीही अनेकदा दिसून आलं आहे. मात्र, एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आल्यामुळे इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

गाझा पट्ट्यातून हमासच्या दहशतवाद्यांकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणावर रॉकेट्सने हल्ला करण्यात आला. त्याचवेळी सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारनं युद्धाची घोषणा करून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

बेंजामिन नेतान्याहूंनी हमासला ठणकावलं!

दरम्यान, इस्रायलकडून हमासच्या तळांवर हल्ले होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त शब्दांत युद्धाची घोषणा केली आहे. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना या युद्धात अद्दल घडवली जाईल. त्यांना असा धडा शिकवला जाईल, ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल”, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं आहे.

मोठी बातमी! इस्रायलने केली युद्धाची घोषणा; पॅलेस्टाईनकडून रॉकेट हल्ल्यांनंतर केलं जाहीर…

नेतान्याहूंचे लष्कराला आदेश!

एकीकडे गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले होत असताना दुसरीकडे बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या लष्कराला सीमाभागातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले आहेत.

गाझा पट्टीच्या लगत असणाऱ्या इस्रायलयच्या सीमाभागात प्रामुख्याने हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून तिथे इस्रायली लष्कराशी दहशतवाद्यांची चकमक चालू आहे.

Israel at War: इस्रायलमधील भारतीयांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना; हमासच्या हमासच्या हल्ल्यानंतर पत्रक जारी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्तापर्यंत हमासच्या या हल्ल्यात २२ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो नागरिक जखमी झाले असून त्यातील अनेक गंभीर असल्याचीही माहिती इस्रायल सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे.