इस्रायल आणि हमासमधील ७ नोव्हेंबरला युद्धाला एक महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले चालूच आहेत. इस्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजूने घेरले आहे.

इस्रायल लष्कराचे प्रवक्ता हेनियल हगारी म्हणाले, “इस्रायलच्या सैन्यांनी हमास आतंकवादी संघटनेचे केंद्र असलेल्या गाझा शहराला घेरले आहे. दोन्हीबाजूंनी युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही.”

हेही वाचा : “तुझ्या मुलाने आज अनेक ज्यु लोकांना मारलं”; इस्रायलने दाखवले हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे धक्कादायक व्हिडीओ

हमासचा सशस्त्र लष्करप्रमुख अबू उबैदाने इस्रायलचे सैनिक काळ्या बँगमध्ये माघारी परततील, असा इशारा दिला आहे. “इस्रायलच्या लष्करानं गाझा पट्टीत मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या जाहीर केली होती. पण, इस्रालयने जाहीर केलेल्या संख्येपेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. तुमचे सैनिक काळ्या बँगमध्ये परततील,” असं अबू उबैदाने सांगितलं.

हेही वाचा :  “हमासला पाठिंबा दिल्यामुळे केरळमध्ये बॉम्बस्फोट”, भाजपाचा आरोप; काँग्रेस-डाव्या पक्षांवर शरसंधान

इस्रालयने गाझावर केलेल्या हल्ल्यात ९ हजार ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ हजार ७६० लहान मुलांचा आणि २ हजार ३२६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ३२ हजार नागरिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १ हजार ४०५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ हजार ४३१ नागरिक जखमी झाले आहेत.