आज भारताने आणखी एका कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. ISRO – इस्रोच्या GSLV F12 या प्रक्षेपकाने-रॉकेटने NVS-01 हा दिशादर्शक उपग्रह २५२ किलोमीटर या नियोजित उंचीवर अपेक्षित वेगासह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. NVS-01 हा उपग्रह IRNSS-1G या उपग्रहाची जागा घेणार आहे. भारतीय उपखंडात संरक्षण क्षेत्र आणि नागरी वापराकरता दिशादर्शक म्हणून या उपग्रहाचा वापर होणार आहे. स्वदेशी बनावटीची ही दिशादर्शक प्रणाली अमेरिकेच्या जीपीएस प्रमाणे काम करत आहे. NVS-01 प्रमाणे याआधीच सहा उपग्रह हे कार्यरत आहेत.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २१ ऑगस्ट २०२१ ला GSLV या रॉकेटच्या शेवटच्या टप्प्यात बिघाड झाला होता, शेवटचा क्रोजेनिक इंजिनाचा टप्पा हा सुरु झाला नव्हता, त्यामुळे ते प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. त्यामुळे अशाच GSLV चे प्रक्षेपण आज होणार असल्यानं इस्रोमध्ये आज काहीसे तणावाचे वातावरण होते. त्यातच आज सकाळी १०.१२ मिनिटांनी होणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे अर्धा तास उशीरा करण्याचे निश्चित झाले.

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
India Ballistic Missile Defence
विश्लेषण :‘आयर्न डोम’ मुळे इस्रायलचा बचाव… भारताकडे कोणती हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली?
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

मात्र GSLV F12 चे प्रक्षेपकाने अचुक काम केले आणि उपग्रह अचुकरित्या नियोजित ठिकाणी प्रक्षेपित केला गेला. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी याबद्द्ल सर्वांचे अभिनंदन केले. दर महिन्याला एक याप्रमाणे इस्रोचे सध्याचे उपग्रह प्रक्षेपण सुरु असून यापुढील काळात आणखी मोहिमा पार पाडणार असल्याचं इस्रोच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये महत्त्वाकांक्षी भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणारी ‘गगनयान’ चाचणी मोहिमही लवरकरच पार पाडणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.