नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी घडवून आणलेल्या आयईडीच्या दोन स्फोटांत भारत- तिबेटियन सीमा पोलिसांचा (आयटीबीपी) एक अधिकारी शहीद, तर दोन जवान जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयटीबीपीच्या ५३व्या बटालियनचे एक पथक रस्ते बांधकामाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गस्तीवर असताना दोंद्रीबेडा व सोनापूर खेडय़ांदरम्यान यापैकी एक घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गस्ती पथक जंगलाच्या एका भागाला वेढा घालत असताना त्यांचा प्रेशर आयईडीशी संबंध येऊन स्फोट झाला. यात उत्तराखंडच्या टिहरीचे रहिवासी असलेले सहायक उपनिरीक्षक राजेंद्र सिंह शहीद झाले, तर शिपाई महेश जखमी झाला, अशी माहिती बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली. दुसऱ्या घटनेत, छोटेडोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रेशर आयईडीच्या संपकार्त येऊन छत्तीसगड सशस्त्र पोलिसांचा शिपाई भीमा सोयाम हा  जखमी झाल्याचे सुंदरराज यांनी सांगितले. आधी छोटेडोंगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला हवाई रुग्णवाहिकेने रायपूरला नेण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itbp official killed 2 jawans injured in naxal blasts in chhattisgarh zws
First published on: 15-03-2022 at 01:28 IST