Amritpal Singh Win Loksabha देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने लोकसभा निवडणूक लढवली होती. पंजाबमधील खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अमृतपाल सिंगने १ लाख ९७ हजार १२० मताधिक्याने विजय मिळवला आहे. खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अमृतपाल सिंग विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा अशी चुरशीची लढत झाली. अमृतपाल सिंगला एकूण ४ लाख ४ हजार ४३० मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा यांना २ लाख ७ हजार ३१० मतं मिळाली.

एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली होती. अमृतपालच्या सहकाऱ्याला अटक केल्यामुळे पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंगवर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सध्या आसाममधील दिब्रुगढ येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Caste, Latur, Latur latest news,
लातूरमधील जातीची गणिते बदलली
Nagpur congress
विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…
Prashant Kishor Jan Suraaj party launch message to Dalits Muslims
तारीख ठरली! प्रशांत किशोर स्थापणार नवा राजकीय पक्ष; दलित-मुस्लिमांना विशेष आवाहन
Rahul Gandhi pc (Nirmal Harindran)
“अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही भाजपाला हरवणार…”, राहुल गांधींचं अहमदाबादमधून थेट मोदींना आव्हान
Gondia Legislative Assembly,
गोंदिया विधानसभेवर विद्यमान अपक्ष आमदारासह यांचाही दावा
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Chandrapur Political Preparations, Political Preparations Heat Up for Assembly Elections, assembly election of chandrapur, many office bearers Claims on constituencies in Chandrapur
चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी, महायुतीत ‘उदंड जाहले इच्छुक’!
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर

हेही वाचा : VIDEO : निकालाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस नेते देवासमोर नतमस्तक, कुणाच्या पदरात यश पडणार?

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खदूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंह गिल विजयी झाले होते. यावेळी खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमृतपाल सिंग, काँग्रेसचे कुलबीर सिंह झिरा, अकाली दलचे विरसा सिंह वल्टोहा व आम आदमी पक्षाचे उमेदवार ललजीत सिंह भुल्लर यांच्यात लढत होत आहे. आसाममधील तुरुंगातून निवडणूक लढवणारा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग विजयी झाला आहे.