काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक वक्तव्य केले होते. याला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे कुटुंबाने देशाशी गद्दारी केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकाचा दाखला देत इतिहास वाचवण्याचा सल्ला ज्योतिरादित्य शिंदे यांना जयराम रमेश यांनी दिला आहे.

जयराम रमेश काय म्हणाले?

जयराम रमेश यांनी ट्वीट करत म्हटलं, “इतिहासाचे कोणतेही पुस्तक घ्या. त्यात १८५७ साली झाशीच्या राणीबरोबर झालेल्या गद्दारीशी सगळ्या इतिहासकारांचे एकमत आहे. तुमचे नवीन देव सावरकर यांनीही आपल्या ‘१८५७ का स्वातंत्र्य समर’ या पुस्तकात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि अन्य लोकांशी शिंदेंनी केलेल्या गद्दारीचा उल्लेख आहे. आपण इतिहास वाचावा,” असं जयराम रमेश यांनी सांगितलं.

हेही वाचा : राहुल गांधी पंतप्रधान होणार का? या प्रश्नावर ChatGpt चे तिरकस उत्तर; म्हणाले. “जेव्हा मी इंग्लंडची…”

याला ज्योतिरादित्य शिंदे यांनी पलटवार करत जयराम रमेश यांना तात्या टोपे यांच्या वंशज्यांनी लिहलेले पुस्तक वाचावे, असं म्हटलं. ट्वीट करत शिंदे म्हणाले, “कधीतरी १८५७ चे वीर योद्धा तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहलेले ‘ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक वाचावे. त्यात कळेल की, आम्ही मराठे-शिंदे, पेशवे आणि झाशीचे नेवाळकर इंग्रजांच्या विरोधात एकत्र होतो. मराठा आजही एकत्र आहे. कृपया तोडफोडीचे राजकारण बंद करा.”

हेही वाचा : काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते ए.के अँटनी यांच्या मुलाचा भाजपात प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादाला कुठून झाली सुरुवात?

ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी ( ५ एप्रिल ) राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. “विरोधी पक्षाच्या एका नेत्याने पूर्ण समाजाला चोर म्हणे हा त्यांचा अपमान आहे. काँग्रेसने आमच्या वीर सैनिकांच्या शौर्याचे पुरावे मागितले आहेत. सीमाभागात चीनने आमच्या सैनिकांना मारहाण केली, असं विधान केले. देशाविरोधात काम करणे हीच काँग्रेसची विचारधारा उरली आहे,” अशी टीका ज्यातिरादित्य शिंदे यांनी केली होती. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.