जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे आज स्थानिक पोलीस, सीआरपीएफ व जवानांकडून संयुक्तरित्या राबण्यात आलेल्या विशेष मोहीमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. लश्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या संयुक्त गटातील हे दहशतवादी होते. लश्कर ए तोयबाचा कमांडर नासीर चद्रू, जावेद फारूख आणि अकीब अहमद अशी या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, बुधावारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील पजलपोर भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली होती. यामध्ये एक जवान देखील जखमी झाला आहे. अद्यापही या संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला असून शोधमोहीम सुरूच आहे.

अनंतनागमधील पजलपोर भागात दहशतवादी लपून बसले असून, मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. जवानांनकडून परिसरास वेढा देण्यात आल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. यावर जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रतित्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir three terrorists killed in anantnag msr
First published on: 16-10-2019 at 13:58 IST