केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारविरोधात काँग्रेस आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. काँग्रेस वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन देशभरात आंदोलन करणार आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत घोषणा केली. १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. या अभियानांतर्गत अर्थव्यवस्थेचे अपयश, बेरोजगारी तसेच महागाईचे प्रश्न अग्रस्थानी असतील. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी शेती आणि शेतकऱ्यांवर होणारे हल्ले, अभूतपूर्व बेरोजगारी, वाढती महागाई या विरोधात लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले होते.

यामध्ये काँग्रेसने पक्षाचे खासदार, आमदारांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबरपासून केंद्राच्या विरोधात पदयात्र, प्रभातफेरी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन समितीची बैठक सोमवारी झाली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा राज्यातील निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये अशाच सभा घेऊ शकतात आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना देशाच्या विविध भागांना भेट देण्यास सांगितले आहे. प्रचाराच्या शुभारंभाच्या अगोदर, काँग्रेस १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान वर्धा, महाराष्ट्र येथे कार्यकर्त्यांच्या गटासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

त्यांना अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील तज्ञांकडून जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांना प्रभावित झालेल्या समस्यांना कसे स्पर्श करायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल. भाजपाच्या राजवटीत इंधनाच्या किमती वाढणे, महागाईचे परिणाम, कृषी कायदे आणि बेरोजगारी यासंबंधीची आकडेवारी पक्ष कार्यकर्त्यांकडे असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jan jagran abhiyan congress launch events across country abn
First published on: 09-11-2021 at 13:04 IST