नवी विकास बँक सुरू करण्याच्या चीनच्या हालचालींना शह देण्याच्या उद्देशाने जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी  आशियातील पायाभूत प्रकल्पांसाठी ११० अब्ज डॉलर्सचा गुंतवणूक आराखडा जाहीर केला.पाच वर्षांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पातील गुंतवणुकीच्या स्वरूपातील मदतीमध्ये जपान आणि आशियाई विकास बँक वाटा ३० टक्क्यांनी वाढवतील, असे अॅबे यांनी सांगितले.