scorecardresearch

“…तर जपान लवकरच नामशेष होईल”, पंतप्रधानांच्या सल्लागारांनी व्यक्त केली भीती

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी जपानमधील लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

japan
फोटो- इंडियन एक्स्प्रेस

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी जपानमधील वेगात घटणाऱ्या जन्मदाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. जन्मदरातील घसरण वेळीच थांबली नाही तर देशाचे अस्तित्वच संपुष्टात येईल. देश नामशेष होईल, अशा आशयाचं विधान मसाको यांनी केलं आहे. जन्मदर असाच घटला तर देशाची अर्थव्यवस्था डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही, असंही मसाको म्हणाले.

मसाको मोरी यांनी ब्लूमबर्गला एका मुलाखतीत सांगितलं की, जपानचा जन्मदर जर असाच कमी होत राहिला तर देश नामशेष होईल. जपानला घटत्या लोकसंख्येमुळे मोठं नुकसान सहन करावं लागेल. देशाची आर्थिक ताकद नष्ट होईल. सामाजिक सुरक्षा व्यवस्था कोलमडून पडेल आणि देशाच्या संरक्षण दलासाठी पुरेशी भरतीही होणार नाही.

२०२२ मध्ये जपानमध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा जवळजवळ दुप्पट लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये २०२२ मध्ये आठ लाखांपेक्षा कमी बाळांचा जन्म झाला आहे, तर सुमारे १५ लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला, असं ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 22:32 IST