जपानच्या ज्या दोघांना इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अतिरेक्यांनी ओलीस ठेवले होते, त्यातील एकाची हत्या करण्यात आली असून जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अॅबे यांनी सुरक्षा कंत्राटदार असलेल्या व इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी ठार मारलेल्या यारूना युकावा याच्या वडिलांशी संवाद साधला व दुसरा ओलीस असलेला मुक्त पत्रकार केन्जी गोटो याला सोडून देण्याची मागणी केली. युकावा याच्या मृत्यूचा व्हिडीओ अतिरेक्यांनी शनिवारी ऑनलाइन टाकला.
या दोन्ही जपानी ओलिसांच्या सुटकेसाठी २०० दशलक्ष डॉलर्सची खंडणी देण्याची आणि जॉर्डनमध्ये पकडलेली महिला अतिरेकी साजिदा अल रिशावी हिला सोडून द्यावे, अशी मागणी इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘इसिस’कडून दोनपैकी एका जपानी ओलिसाची हत्या
जपानच्या ज्या दोघांना इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अतिरेक्यांनी ओलीस ठेवले होते, त्यातील एकाची हत्या करण्यात आली असून जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

First published on: 26-01-2015 at 12:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese isis hostage murdered