एपी, पॅरिस

फ्रान्समधील अतिउजव्या गटाच्या राष्ट्रीय आघाडीचे संस्थापक ज्यँ मारी ल पेन (वय ९६) यांचे निधन झाले. बहुसांस्कृतिकतावाद आणि स्थलांतरितांना त्यांचा प्रखर विरोध होता. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थक पाठिराखे आणि विरोधकही लाभले.

ल पेन हे फ्रान्सच्या राजकारणामधील ध्रुवीकरण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते. ज्यू-विरोध, भेदभावाची वर्तणूक आणि वांशिक हत्यांना प्रवृत्त करण्यासाठी ते अनेकदा दोषी ठरले. मात्र, असे असूनही फ्रान्समध्ये ते लोकप्रिय होते. ‘फ्रेन्च पीपल फर्स्ट’ यांसारख्या घोषणांमधून त्यांची विचारधारा फ्रान्स आणि युरोपातील इतर देशांत वाढताना दिसत आहे. प्रलय संकल्पनेचा नकार, मुस्लिमांची आणि स्थलांतरितांची वर्णद्वेषी निंदा, १९८७मधील एड्स झालेल्या व्यक्तींना जबरदस्तीने विलग ठेवण्याचा प्रस्ताव यांसारख्या त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या टीकाकारांनाही एके काळी धक्के बसले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.