जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका जाहीर झाली आहे. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अंतर्गत तिसऱ्या सत्राचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. JEE Main परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै ते २५ जुलै दरम्यान झाल्या होत्या.

पूरग्रस्त महाराष्ट्र वगळता देशभरातील उमेदवारांसाठी २०, २२, २५ आणि २७ जुलै रोजी जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली. यानंतर, एनटीएने ३ आणि ४ ऑगस्ट रोजी या क्षेत्रांमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी एनटीएने उत्तर पत्रिका जाहीर केली आहे. त्यामुळे जेईई मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
exam, exam paper
परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २ ते ४ एप्रिलऐवजी ४ ते ६ एप्रिल दरम्यान परीक्षा

एनटीएकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण पुढील एक दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या वर्षी ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा सत्र ३ साठी नोंदणी केली होती. जेईई मुख्य निकालासह, एनटीए कटऑफ आणि स्कोअरकार्ड देखील जारी करेल. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना jeemain.nta.nic.in  अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

कसा पाहाल निकाल?

  • निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
  • वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
  • तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
  • निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

अंतिम उत्तर पत्रिका मिळवण्यासाठी :

  • jeemain.nta.nic.in वेबसाईवर जा
  • होमपेजवर NATIONAL TESTING AGENCY JEE (Main) Session – 3, 2021 FINAL ANSWER KEY AS ON 05.08.2021 पर्याय निवडा
  • उत्तर पत्रिकेची पीडीएफ फाईल मिळेल.
  • तुमची उत्तरे आणि ही उत्तरे जुळतात का पाहावी… यावरुन तुम्हाला निकालाचा अंदाज येऊ शकेल