रायपूर : झारखंडमधील संयुक्त पुरोगामी आघाडीचे ३० आमदार रविवारी विशेष विमानाने रायपूर येथून रांची येथे दाखल झाले आहेत. सोमवारी झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप फोडाफोडी करेल, या भीतीने संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्या आमदारांना छत्तीसगढमध्ये ३० ऑगस्टला नेले होते.
रायपूरजवळील एका आलिशान विश्रामगृहात त्यांना ठेवण्यात आले होते. झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चाचे ३० तर काँग्रेसचे १८ राष्ट्रीय जनता दल १ असे सत्तारूढ आघाडीचे संख्याबळ आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे २६ सदस्य आहेत. सोमवारी विशेष अधिवेशनात सोरेन सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.