लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसला मोठमोठे धक्के बसत आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या अनेक शिलेदारांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते कमलनाथ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कमलनाथ आणि त्यांचे पूत्र नकुलनाथ हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. अशातच मध्य प्रदेश भाजपा प्रवक्ते आणि कमलनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ आणि नकुलनाथ यांचे काही फोटो एक्स या मायक्रोप्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तसेच या फोटोंसह ‘जय श्री राम’ असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, नकुलनाथ यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रोफाईल बायोमधून काँग्रेससंबंधीची माहिती हटवली आहे. त्यामुळे नाराजीच्या चर्चांना आणखी जोर आला. तसेच कमलनाथ आणि नकुलनाथ दुपारी दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे ते पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीला जात असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. या सर्व गदारोळामुळे मध्य प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

bjp attacks congress over sam pitroda wealth distribution remark
भाजपच्या हाती पित्रोदांच्या‘वारसा करा’चे कोलीत; भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसची अडचण
rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
solapur lok sabha, bjp candidate ram satpute
सोलापुरात गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने; तुंबळ घोषणा युद्ध

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांना या चर्चांवर भाष्य करावं लागलं. पटवारी यांनी कमलनाथ यांच्याबाबत पसरत असलेल्या अफवांचं खंडण केलं. तसेच ते म्हणाले, कमलनाथ कुटुंब आणि गांधी कुटुंबातली केमिस्ट्री आम्ही आणि संपूर्ण देशाने पाहिली आहे. १९८० मध्ये कमलनाथ पहिल्यांदा निवडणूक लढले होते, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की कमलनाथ माझा तिसरा मुलगा आहे. इंदिरा गांधी कमलनाथांना उल्लेख तिसरा मुलगा असा केला होता. त्यापुढे जाऊन गेल्या ४५ वर्षांपासून कमलनाथ यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन संघर्ष केला आहे. ४५ वर्षांच्या राजकीय प्रवासात मध्य प्रदेशमधील प्रमुख काँग्रेस नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आलो आहोत. तेदेखील आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून, सुख-दुःखात सर्वांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जात राहिले. त्यांनी काँग्रेसचे विचार दृढतेने मांडले.

“इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल का?”

जीतू पटवारी म्हणाले, कमलनाथ यांनी संघर्षाच्या काळात बेडरपणे काम केलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचं सरकार पाडलं तेव्हादेखील आम्ही सगळे कमलनाथ नावाच्या या एका छताखाली एकत्र आलो. मला एकच सांगायचं आहे की, कमलनाथ यांच्याबाबत ज्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत त्या निराधार आहेत. त्यांना काहीही अर्थ नाही. कमलनाथ कधीही पक्ष सोडण्याचा विचार करणार नाहीत. तुम्हीदेखील कधी असा विचार कराल का? इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल का? काँग्रेस सोडण्याचा विचार त्यांच्या स्वप्नातही आला नसेल.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी कमलनाथ यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढलो. कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही संघर्ष केला, रस्त्यावर उतरलो, आंदोलनं आणि प्रचार केला. त्यांच्यासाठी आम्ही इतकं सगळं केलं आणि आता ते आम्हाला सोडून जातील? मला नाही वाटत की ते आम्हाला सोडून भाजपात जातील. त्यांच्याबाबत पसरत असलेल्या सर्व अफवांचं मी खंडण करतो आणि पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, कमलनाथ काँग्रेसमध्येच राहतील.