Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. जगभरातील अनेक देशांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारत सरकारने देखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत कठोर भूमिका घेतली आहे. यादरम्यान जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशन (JKSA) काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशन (जेकेएसए) ने देशाच्या विविध भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना घरामध्येच राहा तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघर्ष किंवा वादावादी टाळा अशा सूचना दिल्या आहेत. या बरोबरच प्रक्षोभक किंवा राजकीय कंटेट ऑनलाईन पोस्ट करणे टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागात तणाव वाढला असून जागोजागी निषेध नोंदवला जात आहे. यादरम्यान काश्मिरी नागरिकांना त्रास देण्यात आल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सतर्क राहण्याचे आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संघटनेने दहशतवादी हल्ल्याचा निषेध देखील नोंदवला असून हा हल्ला क्रूर आणि भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. कोणतेही कारण किंवा विचारधारा या क्रूर कृतीचं समर्थन करू शकत नाही असे म्हटले आहे.

“मला आज सकाळी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे (काश्मीरी) फोन येत राहिले. उत्तराखंड येथे सकाळी काश्मीरी मुस्लिम विद्यार्थ्यांना त्यांचे राज्य सोडून जाण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. यामुळे फक्त डेहराडून येथेच नाही तर इतरही ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास देण्यात आल्याबाबत आम्हाला फोन येत आहेत,” असे जेकेएसएचे राष्ट्रीय अध्यक्ष उमर जमाल यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले .

ऑनलाइन प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये काश्मिरी मुस्लिम विद्यार्थ्यांना सकाळी त्यांचे राज्य रिकामे करण्याचा अल्टिमेटम देण्यात आल्याचे दाखवल्यानंतर उत्तराखंडमध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर आहे. यामुळे केवळ देहरादूनमधील विद्यार्थ्यांमध्येच नाही तर इतर ठिकाणीही भीती निर्माण झाली. आम्हाला असे त्रासदायक फोन येतात जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास देण्यात आला,” असे जेकेएसएचे राष्ट्रीय अध्यक्ष उमर जमाल यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

तसेच संघटनेकडून पीडित विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाशी देखील समन्वय साधला जात आहे. दरम्यान या संघटनेला मदतीसाठी चंदीगड, प्रयागराज आणि हिमाचल प्रदेश येथूनही अनेक कॉल आल्याचे सांगितले जात आहे.

हेल्पलाईन क्रमांक जारी

जेकेएसएने या संघटनेकडून स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रतिसाद टीम तयार करण्यात आली आहे. अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेकेएसएने खालील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत: ९१४९६७६०१४, ७००६९२२२८९, ८८२५००५३२७, ९९०६२९९१९९, ९६०२६८९६२२, ६००६१६९४७७, ८०८२६०२४४५, ९१४९५००६२३, ६००६३३३५८४.

तसेच दिल्लीतील जम्मू आणि काश्मीर सरकारच्या रेसिडन्ट कमिशनने देशाच्या विविध भागात राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी २४X७ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत: ७३०३६२००९०, ९६८२३८९२६५, ९४१९१५८५८१, ०११२४६१११०८, ०११२४६१५४७५, ०११२४६१११५७, ०११२६११२०२१, ०११२६११२०२२.