इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मोठा धक्का बसलाय. आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलमधून बाहेर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्सने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.

ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोश फिलीपीने आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केलं होतं. सलामीला येत त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. पण यंदाच्या आयपीएलमधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयपीएल लिलावात 21 वर्षीय फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. मात्र आता जोश फिलिपने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याने फिनला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. फिनने अद्याप न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलेलं नाही, पण अलिकडेच संपलेल्या न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत त्याने शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.