Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तिची कसून चौकशीही सुरु आहे. दरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी आता पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत तिने पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही उल्लेख केले आहेत.

ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती

ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाते आहे. तिने पाकिस्तानला काय काय माहिती पुरवली आहे? हे जाणून घेतलं जातं आहे. दरम्यान पोलिसांना तिची एक डायरी मिळाली आहे. ही डायरी २०१२ चं कॅलेंडर असलेली आहे. डायरीमध्ये पाकिस्तानबाबत काय वाटतं ते ज्योतीने लिहिलं आहे. ज्योती म्हणते, हम सभी एक धरती, एक मिट्टी के बने हैं. पाकिस्तानात फिरण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला असंही ज्योतीने लिहिलं आहे.

सरहदो की दूरियां पता नही…

ज्योती तिच्या डायरीत म्हणते, “सरहदो की दूरियां पता नहीं कबतक बरकरार रहेंगी, पर दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाएं” पाकिस्तान सरकारला मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकांसाठी गुरुद्वारे आणि मंदिरं खुली करावीत. त्यांनी तसं केलं तर पाकिस्तानात हिंदू जास्त प्रमाणावर येतील. तसंच १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी जे वेगळे झाले आहेत असे लोक, अशी कुटुंबं एकत्र येण्यास मदत होईल. पाकिस्तान खूप सुंदर आहे. क्रेझी आणि कलरफुल असाही उल्लेख ज्योतीने केला आहे. आता या सगळ्यानंतर काय काय समोर येणार आहे ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

Jyoti Malhotra Biography
तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ती पाकिस्तानातील लाहोरमध्ये फिरताना दिसत आहे. (छायाचित्र: ट्रॅव्हल विथ जो/एफबी)

पाकिस्तानला माहिती कशी पुरवत होती ज्योती?

हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीत नवनवे खुलासे समोर येत आहेत. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सच्या माध्यमातून ती काही संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर आहे.

चीनलाही जाऊन आली आहे ज्योती मल्होत्रा

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तानला अनेकदा जाऊन आली आहे. मात्र, त्यासोबतच ती चीनलादेखील गेली होती. तिच्या प्रवासाचा तपशील आणि आर्थिक बाबींची तपासणी केली जात आहे. ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह्ज अर्थात PIO च्यादेखील संपर्कात होती. ज्योतीकडे भारतीय लष्कर किंवा संरक्षण विभागाशी संबंधित बाबींची थेट माहिती मिळण्याची शक्यता नसली, तरी ती ज्या ठिकाणी राहाते, ते हिसार एक महत्त्वाचं धोरणात्मक ठिकाण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतीचा लॅपटॉप आणि फोनही रडारवर

“आम्ही ज्योती मल्होत्राचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन घेतला आहे. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तिनं नेमकी कोणती माहिती पाकिस्तानातील हस्तकांना दिली आहे, याचीही माहिती समोर येऊ शकेल. ज्योती पाकिस्तान दूतावास आणि पीआयओंच्या संपर्कात कशी आली? कुणी तिला मदत केली? याचीही चौकशी आम्ही करत आहोत. सायबर तज्ज्ञांचं एक पथक ज्योतीच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचीही तपासणी करत आहेत.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.