दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते. नंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार  ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलंय.

आदित्य ठाकरेंनी केलं अभिनंदन..

“दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील कलाबेन डेलकर यांचं अभिनंदन केलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalaben delkar wins from dadra nagar haveli constituency against bjp mahesh gavit hrc
First published on: 02-11-2021 at 16:11 IST