बंगळूरु पोलिसांनी मंगळवारी प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा (४७) याला हत्या प्रकरणात अटक केली. त्यानंतर त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यापूर्वी त्याची चौकशी करण्यात आली. ९ जून रोजी रेणुकास्वामी नामक व्यक्तीचा मृतदेह नाल्यात सापडला होता. त्याच्या हत्येच्या संशयात दर्शन आणि अन्य १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दर्शनच्या एका साहाय्यकाच्या मालमत्तेत रेणुकास्वामीची कथित हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कामाक्षिपल्य येथील नाल्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याच्या अंगावर जखमा असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांकडून मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> शत्रुघ्न सिन्हांनंतर आता सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल तिच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाला, “मी सध्या…”

सीसी टीव्ही चित्रण आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत व्यक्ती रेणुकास्वामी असल्याचे स्पष्ट झाले, असे आयुक्त दयानंद यांनी सांगितले. हत्येच्या संशयात सुरुवातीला ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली.

फार्मसी कंपनीत काम करणाऱ्या चित्रदुर्गा जिल्ह्यातील रेणुकास्वामी यांनी समाजमाध्यमात अभिनेता दर्शन यांची मैत्रीण तथा अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्याविरोधात अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या हत्येमध्ये दर्शनचा थेट सहभाग होता की तो कटाचा भाग होता याचा आम्ही शोध घेत आहोत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. २००२ मध्ये मॅजेस्टिक चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केले आहे.

रेणुकास्वामी आमचा एकुलता एक मुलगा होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. शनिवारी माझे त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. आम्हाला न्याय हवा आहे.

श्रीनिवासय्यारेणुकास्वामीचे वडील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्येप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीदरम्यान अभिनेता दर्शनचे नाव समोर आले आहे, त्यामुळे त्याला चौकशीसाठी आणण्यात आले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. – जी. परमेश्वर, गृहमंत्री, कर्नाटक