सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात संवाद सुरु असतानाच अचानक कपिल सिब्बल यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे सुनावणी थांबवत डी. वाय. चंद्रचूड हे सिब्बल यांच्या मदतीला धावले.

नेमकं काय घडलं न्यायालयात?

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी सुरु होती. त्याचवेळी युक्तिवाद करत असलेले तुषार मेहता अचानक थांबले आणि वळून म्हणाले कपिल सिब्बल कुठे आहेत? यानंतर याचिकाकर्त्यांकडून आलेल्या कपिल सिब्बल यांच्या टीमने मेहता यांना काहीतरी सांगितलं. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही याबाबत विचारणा केली. त्यावेळी कपिल सिब्बल यांची प्रकृती बिघडल्याचं सुरुवातीला कळलं नाही. मात्र सुनावणी सुरु झाल्यानंतर सिब्बल काहीसे उशिरा न्यायालयात आले. त्यावेळी मेहता यांनी सांगितलं की कपिल सिब्बल यांची प्रकृती बरी नाही. यानंतर चंद्रचूड त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांना कॉन्फरन्स रुममध्ये बसण्याची मुभा दिली आणि व्हिडीओ लिंकद्वारे तुम्ही सुनावणीत सहभागी होऊ शकता असंही सांगितलं. त्यानंतर कपिल सिब्बल कॉन्फरन्स रुममध्ये गेले आणि व्हिडीओ लिंकद्वारे सुनावणीत सहभागी झाले.

dy chandrachud voting appeal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, “या खेपेला…”
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता

जेवणाच्या सुट्टीनंतर कपिल सिब्बल न्यायालयात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती सुधारली होती. सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात तुषार मेहता आणि कपिल सिब्बल यांच्यातला युक्तिवादही रंगला होता. यावेळी तुषार मेहता म्हणाले की काँग्रेसला देणगी देणाऱ्या माणसाला हे कधीच वाटणार नाही की भाजपाला याविषयी माहिती मिळावी. उदाहरणादाखल मी असं सांगेन की कपिल सिब्बल यांना हे माहीत आहे की मी काँग्रेसला देणगी देतो आहे. त्यावेळी मला हे कधीच वाटणार नाही की भाजपाला हे समजावं. त्यावर सिब्बल चटकन म्हणाले मी आता काँग्रेस पक्षाचा सदस्य नाही हे बहुदा मेहता विसरले असावेत. अशा पद्धतीने दुपारनंतर या दोघांमध्ये युक्तिवाद रंगला होता.