कर्नाटक सरकारनं करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून शनिवारी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. उद्यापासून (२५ जुलै) करोनाचे नियम पाळत राज्यातील धार्मिक स्थळाजवळील व्यवहार आणि मनोरंजन पार्क उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी मंदिर उत्सव, रॅली आणि सभांना परवानगी नसणार आहे. वॉटरपार्कला अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही. या महिन्यांच्या सुरुवातील धार्मिक स्थळ सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. तेव्हा फक्त दर्शन घेण्याची अट होती. विशेष सेवा आणि इतर व्यवहारांना मंजुरी नव्हती.

“मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. जत्रा, धार्मिक कार्यक्रम यांना परवानगी नसेल”, असं कर्नाटक सरकारडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकात शुक्रवारी करोनाचे १ हजार ७०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ९१ हजार ६९९ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा ३६ हजार ३२३ वर पोहोचला आहे. राज्यात मागच्या २४ तासात २ हजार २४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८ लाख ३१ हजार २२६ इतकी झाली आहे. राज्यात एका दिवसात आढळून आलेल्या १,७०५ रुग्णांपैकी ४०० रुग्ण बंगळुरु शहरातील आहेत.