“राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात,”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे

Karnataka BJP state president Nalin Kumar Kateel, Rahul Gandhi
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे (File Photo: PTI)

काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून तस्कीरदेखील करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे. काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी मोदींबद्दलच्या त्या ट्वीटवरुन आक्षेप नोंदवला असून डिलीट करण्याचा आदेश दिला आहे.

“भीक मागण्यास मनाई असूनही…,” काँग्रेसची मोदींवर आक्षेपार्ह टीका; ‘अंगूठा छाप’ म्हटल्याने मोठा वाद

“राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,” असं नलीन कुमार कटील यांनी म्हटलं आहे.

मोदींसंबंधीच्या ‘त्या’ ट्वीटनंतर डी शिवकुमार यांनी म्हटलं आहे की, “राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे”. तसंच सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन केलेलं असंसदीय ट्वीट खेदजनक असून काढण्यात येत आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर त्यांनी याची आठवण करुन दिली.

डी शिवकुमार यांनी नलीन कुमार कटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागलं पाहिजे असं मी काल म्हटलं होतं. भाजपा माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागेल अशी अपेक्षा करतो “.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka bjp state president nalin kumar kateel says rahul gandhi is a drug addict peddler sgy

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या