कर्नाटक विधानसबा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) अर्थात जेडीएसचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. आता २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जेडीएसनं सप्टेंबर महिन्यात युती केली आहे. पण, भाजपाबरोबर जाण्यावरून जेडीएसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. जेडीएस कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी भाजपाबरोबर जाण्यास विरोध दर्शवला आहे.

भाजपाबरोबर न जाण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. पक्षाचे अध्यक्ष एचडी देवेगौडा आणि नेते, एचडी कुमारस्वामी यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल. तर, त्यांचा मार्ग मोकळा आहे, असं इब्राहिम यांनी सांगितलं.

हेही वाचा : भाजपाशी युती केल्यामुळे जेडीएसपुढे अडचणींचा डोंगर! केरळनंतर आता कर्नाटकचे अनेक नेते नाराज

“जेडीएस एनडीएबरोबर जाणार नाही, हे आमचं पहिलं मत आहे. तर, देवेगौडा यांनी जेडीएस-भाजपा युतीला पाठिंबा देऊ नये, अशी आमची विनंती आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचं समर्थन करतो. प्रदेशाध्यक्ष या नात्यानं कर्नाटकातील पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे,” असं इब्राहिम म्हणाले.

“आमच्याबरोबर येणारे येऊ शकतात. जाणाऱ्यांनी जावं. कुणाबरोबर किती आमदार जातात, हे पाहू. मी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आहे. आम्ही भाजपाबरोबर युती करणार नाही. इंडिया आघाडीबरोबर चर्चा करू आणि कर्नाटकात आमचा निर्णय घेऊ,” असं इब्राहिम यांनी सांगितलं.

हेही वाचा : कर्नाटक : जेडीएस-भाजपा यांच्यात युती, आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एचडी देवेगौडा वडिलांसारखे, तर कुमारस्वामी लहान बंधूसारखे आहेत. त्यांनी माघारी यावं. या निवडणुकीत पराभव झाला असेल. पण, प्रत्येक वर्षी निवडणुका होतात,” असं इब्राहिम यांनी म्हटलं.