‘अब की बार ४०० पार’, अशी घोषणा देऊन भाजपा नेत्यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग बांधला आहे. अर्थात कार्यकर्ते आणि मोदींचे चाहतेही यात मागे नाहीत. कर्नाटकमध्ये मोदींच्या एका चाहत्याने स्वतःचे बोट कापून कालीमातेला अर्पण केल्याचा प्रकार घडला आहे. अरुण वर्नेकर असे या चाहत्याचे नाव आहे. कर्नाटकच्या कारवार शहरात राहणारा वर्नेकर मोदींचा मोठा चाहता असून त्याने राहत्या घरात मोदींचे मंदिर बांधले आहे. कालीमातेने पंतप्रधान मोदींचे रक्षण करावे, यासाठी स्वतःच्या रक्ताने भिंतीवर संदेश लिहिण्याच्या नादात वर्णेकरने स्वतःचे बोटच छाटले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वर्नेकर मोदींचा मोठा चाहता आहे. मोदींना तो ‘मोदी बाबा’ असे संबोधतो. अरुणच्या आईने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या कार्याची माहिती वर्नेकर लोकांना सांगत असतो. भारत-चीन संघर्ष, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे, याबद्दल अरुण नेहमी बोलत असतो.

“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान

अविवाहित असलेला वर्नेकरचे हे मोदी प्रेम नवे नाही. २०१९ च्या निवडणुकीतही त्याने असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. यावेळी मात्र त्याने स्वतःच्या डाव्या हाताची तर्जनी छाटून काली मातेला अर्पण केली. यामुळे कारवार शहरात आता अरुण वर्नेकरची चांगलीच चर्चा होत आहे.

‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे कारवारमधील पदाधिकारी जगदीश नाईक यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा शूद्ध वेडेपणा आहे. असे प्रकार करण्यापेक्षा अरुण वर्नेकरने मोदींच्या कामांना लोकांमध्ये घेऊन जायला हवे. हे काम केले असते तर मोदींनाही आवडले असते. भाजपाचे आणखी एक नेते नंदकिशोर म्हणाले की, हा धक्कादायक प्रकार आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की, त्यांनी असा वेडेपणा करू नये. मोदी जिकांवेत असे आपल्या सर्वांनाच वाटते. मोदींबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे इतरही मार्ग आहेत. पण असे मार्ग कुणी निवडू नयेत.