भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येनंतर कर्नाटक राज्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना रद्द केले आहेत. असे असताना कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. शफिक बलेरे आणि झाकीर सावनुरू असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर मुस्लीम असल्यामुळेच आम्हाला लक्ष्य केलं जातंय, असा आरोप शफिकच्या वडिलांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. या वृत्तानुसार “मी प्रवीणच्या दुकानात काम करायचो. दुकानात माझा मुलगा आणि प्रवीण बोलायचे. प्रवीण आमच्या घरीदेखील यायचा. माझ्या मुलाला अटक का करण्यात आले, हे मला समजलेले नाही. फक्त मुस्लीम असल्यामुळे आम्हाल टार्गेट केले जातेय. शफिक आणि झाकीर दोघेही गुन्हेगार नाहीत,” असे शफिकचे वडील इब्राहीम यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मेहबुबा मुफ्ती यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं आव्हान; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”

नेमकं काय घडलं?

जिल्हा भाजपा युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची बेल्लारे येथील त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी वार करून हत्या केली होती. ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील नेट्टारू येथील रहिवासी होते. या हत्येनंतर बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटना घडल्या. हिंदू कार्यकर्त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत भाजपा आणि संघ परिवाराच्या समर्थकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा >>> “माझ्याशी बोलू नका,” लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जोरदार खडाजंगी, सुप्रिया सुळेंना करावी लागली मध्यस्थी

तर या घटनेनंतर बसवराज बोम्मई यांनी बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यात विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,असे सांगितले होते. तसेच प्रवीण यांच्या हत्येनंतर आमच्या मनात संताप आहे. शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर काही महिन्यांत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मला दुःख झालंय, अशी भावना बोम्मई यांनी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka praveen nettaru bjp yuva worker murder case accused father said my son targeted because being muslim prd
First published on: 28-07-2022 at 22:29 IST