लोकसत्ता टीम

नागपूर : कोणाचे दिवस आले आणि कोणाचे दिवस भरलेत हे थोड्याच दिवसात समोर येणार असले तरी उद्धव ठाकरे यांचा राजकीय दृष्ट्या जनाधार संपला एवढे मात्र खरे आहे आणि हे ४ जून नंतर त्यांच्या लक्षात येईल अशी टीका शिंदे गटाच्या ज्येष्ट नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली.

BJP Party President JP Nadda statement regarding National Service Union
…तर मग संघ आता काय करणार?
Nirbhay Bano Movement, Nirbhay Bano Movement Rises, Modi Shah s tendency, Repressive Politics, Repressive Politics in Maharashtra, Nirbhay Bano Movement in Maharashtra, asim sarode, Vishwambhar Choudhari,
‘निर्भय बनो’ आंदोलन ही प्रवृत्तीविरोधातली लढाई…
BJP silence on Mayawati sparks discussion
मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण
Muslim Appeasement Politics of Congress
पहिली बाजू : ‘त्यांना काय वाटेल?’
Sharad Pawar criticized the country dictatorship under the leadership of Modi in the welfare meeting
मोदींच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे ! कल्याणच्या सभेत शरद पवारांची टीका
Congress, Bhushan Patil, campaign,
काँग्रेसचे भूषण पाटील यांच्या दिमतीला आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांची फौज
Who is Shantigiri Maharaj Why is his candidature in Nashik becoming troublesome for Mahayutti
शांतिगिरी महाराज कोण? त्यांची नाशिकमधील उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी का ठरतेय?
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

रामटेक मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते गेल्या काही काही जाहीर सभेतून काही बोलत असतात. जे त्यांच्या मनात आहे तेच बोलत आहे मात्र जमिनीवरील लोकांचे काय मत आहे याचा विचार करत नाही. केवळ टीका करण्यापेक्षा त्यांनी अडीच वर्षात काय केले हे जनतेला सांगितले पाहिजे. मात्र त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नाही अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांच्याबाबत न बोललेले बरे. ते प्रचंड ज्ञानी आहे, त्यांच्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना कुठले उत्तर न देणे हेच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे असल्याची टीका त्यांनी केली.

आणखी वाचा-येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच

विदर्भात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल आहे…प्रचार सुरू होण्याअगोदर त्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिलेले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी सभा घेत आहे मात्र त्यांनी दिलेले वचन व जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंगाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही ना याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे असेही गोऱ्हे म्हणाल्या.

भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. भावनाताईचे कार्य दुर्लक्षित राहणार नाही. त्यांना वेगळी जबाबदारी देऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री ते स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा-“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

रवींद्र वायकर यांच्या उमेदवारी संदर्भात काही भाकीत करण्यासारखे मध्ये नाही. त्यावर होलणे म्हणजे रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषी प्रमाणे काही तरी सांगण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याचे पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, किती नुकसान झाले. याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे.