केरळमधील कोडूनगल्लूर येथील भाजप युवा मोर्चाचा नेता राजेश इराकेरी याच्या घरातून पोलिसांनी दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि या नोटा छापणारी मशिन जप्त केली केली आहे. घटनेनंतर राजेश पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोडूनगल्लूर या भागातील भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता राजेश हा स्थानिकांना व्याजावर पैसे देण्याचे काम करतो. राजेश आणि त्याचा भाऊ राजीव हे दोघेही भाजपचे कट्टर समर्थक आहेत. राजीव हा भाजपच्या ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी आहे. या दोघांच्या घरातून पोलिसांनी गुरुवारी दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा यात समावेश आहे. पोलिसांनी राकेशला अटक केली असून त्याचा भाऊ राजेश मात्र पसार आहे. या दोघांच्या घरातून नऊ लाख रुपयांच्या नोटादेखील जप्त करण्यात आल्या आहेत.  घरातील दुसऱ्या मजल्यावर बनावट नोटा छापण्याचा छोटा कारखानाच सुरु होता. या मजल्यावर नोट छापण्याची मशिन, त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशाविरोधात मोहीम सुरु केली आहे. बनावट नोटांवर चाप लावण्यासाटी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते बनावट नोटा तयार करत असल्याचे समोर आल्याने भाजपची नाचक्की झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala fake currency notes and machines seized during raid at bjp yuva morcha leader home in kodungallur
First published on: 22-06-2017 at 19:43 IST