ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्से यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (Twitter CEO) पदाचा राजीनामा देताना ३ प्रमुख कारणं सांगितली आहेत. या ३ पैकी पहिलं कारण नवनियुक्त पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती हे सांगितलंय. मात्र हे कारण त्यांनी पराग अग्रवाल यांच्या क्षमतांवरील विश्वास यामुळेच दिलंय. त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना देताना पराग अग्रवाल यांचं तोंड भरून कौतुक केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॅक डोर्से म्हणाले, “जवळपास १६ वर्षे कंपनीत सहसंस्थापक ते सीईओ अशा विविध पदांवर काम केल्यानंतर आता मी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. कंपनीच्या संस्थापकांनीच कंपनीचं नेतृत्व करण्याच्या महत्त्वाविषयी खूप चर्चा आहे. पण मला वाटतं यामुळे काही मर्यादा येतात. मी या कंपनीला तिच्या संस्थापकांपासून दूर नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलाय. यामागे प्रमुख ३ कारणं आहेत.”

“पहिला कारण परागची सीईओ पदावर नियुक्ती”

“पहिला कारण परागची सीईओ पदावर नियुक्ती होते आहे हे आहे. संचालक मंडळाने सर्व पर्यायांचा विचार करून एकमताने परागच्या नावावर शिक्कामोर्तब केला. तो माझीही निवड होता. त्याला कंपनीची आणि कंपनीच्या गरजांची खूप खोलवर समज आहे. ट्विटरच्या वाढीमागील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे पराग होता,” असं जॅक यांनी सांगितलं.

“पराग जिज्ञासू, संशोधक, तार्किक, सृजनशील, नवं मागणारा, स्वतःबद्दल सतर्क असणारा आणि विनम्र आहे. तो त्याच्या ह्रदय आणि आत्म्यातून नेतृत्व करेन. तो असा व्यक्ती आहे ज्याच्याकडून मी दररोज शिकतो. मला आपल्या कंपनीचा सीईओ म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे,” असंही जॅक डोर्से यांनी नमूद केलं.

“दुसरं कारण ब्रेट टेलर यांनी संचालक मंडळाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणे”

जॅक आपल्या राजीनाम्यामागील दुसरं कारण नमूद करत म्हणाला, “दुसरं कारण ब्रेट टेलर यांनी संचालकमंडळाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दिली. मी सीईओ झालो तेव्हा मी ब्रेटला संचालक मंडळात येण्याची विनंती केली होती. तो प्रत्येक दृष्टीने सर्वोत्तम आहे. तो स्वतः इंजिनियर असून उद्योन्मुखता, धोका पत्करणं, तंत्रज्ञान, कंपनीचा विस्तार याची त्याला खूप चांगली समज आहे. सध्या संचालक मंडळाला आणि कंपनीला हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्याच्यात आहेत. ब्रेट नेतृत्व करत असल्यानं मला संचालक मंडळाच्या शक्तीवरील आत्मविश्वास वाढलाय. यामुळे मला किती आनंद झालाय याची तुम्हाला कल्पना करता येणार नाही.”

हेही वाचा : Twitter: जुनं फिचर बंद करून ट्विटर नव्या अपडेटच्या तयारीत; आता कंटेन्ट क्रिएटर्स पैसे…

“राजीनाम्यामागील तिसरं कारण ट्विटरची संपूर्ण टीम”

“राजीनाम्यामागील तिसरं कारण तुम्ही सर्वजण आहात. आपल्या कंपनीच्या या टीममध्ये खूप महत्त्वकांक्षा आणि ताकद आहे. हेच पाहा ना परागनं इथं इंजिनियर म्हणून सुरुवात केली आणि आज तो सीईओ झालाय. मी देखील असाच प्रवास केलाय, पण परागने माझ्यापेक्षा चांगला प्रवास केला. याचा मला खूप अभिमान वाटतो. टीममधील या सर्व उर्जेचा पराग खूप चांगला वापर करू शकेल. कारण तो ते जगलाय आणि त्यासाठी काय करावं लागतं हे त्याला माहिती आहे. तुम्हा सर्वांमध्ये कंपनीचा चांगल्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याची शक्ती आहे. मला मनापासून असं वाटतं.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why twitter co founder jack dorsey say first reason of resignation is parag agrawal pbs
First published on: 30-11-2021 at 13:22 IST