कोलकातमध्ये १६ वर्षीय मुलीने सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर स्वत:ला घरीच जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता नंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. तसेच उपचारा दरम्यान, डॉक्टरांनी पिडीत मुलगी गर्भवती असल्याचा म्हटले आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलकाता पोलिसांनी आपल्याला मुलीच्या मृतदेहासह राज्य सोडून बिहारमध्ये परत जाण्यास सांगितले आहे असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. मुलीचे वडील टॅक्सीचालक असून त्यांनी सांगितले, की पोलिसांनी काल रात्री आपल्याला मुलीचा मृतदेह घेऊन बिहारमध्ये परत जाण्याची धमकी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी व काही स्थानिक लोकांनी आपल्याला राज्यातून बाहेर न गेल्यास टॅक्सी चालवू देणार नाही अशी धमकी दिली आहे, असेही ते म्हणाले.
कोलकाता सामूहिक बलात्कारप्रकरणी मुलीच्या वडिलांवरच पोलिसांचा दबाव
“या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपचारा दरम्यान, पिडित मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले होते. तिचे गर्भ पुढील वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.” अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत यांनी दिली.