पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याविषयी प्रसिद्धी कवी कुमार विश्वास यांनी सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. २०१८ मधील जश्न-ए-रेख्ता या कार्यक्रमाच्या या व्हिडीओत कुमार विश्वास पंडित नेहरूंच्या मोठेपणाविषयी सांगताना कवी नागार्जून यांनी नेहरूंविरोधात त्यांच्याच समोर वाचलेली कविता आणि त्यावर नेहरूंचा प्रतिसाद यावर बोलताना दिसत आहेत. त्यात पंडित नेहरूंविरोधात बोलूनही त्यांनी त्या कवीला ईडी-सीबीआयचं समन्स पाठवलं नव्हतं,असं विश्वास नमूद करत मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

कुमार विश्वास म्हणतात, “पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिन होता. त्यानिमित्ताने बच्चनजींनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासाठी भारतातील सर्व मोठे कवी त्या दिवशी आले होते. नागार्जूनही बच्चनजींना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा इंदिरा गांधी कार्यक्रम सुरू होणार असल्याने कवींना बोलावण्यास आल्या. तेव्हा त्यांनी नागार्जूनही आल्याचं पाहिलं.”

“इंदू तुझे वडील माझी कविता ऐकू शकणार नाहीत”

“इंदिरा गांधींनी नागार्जून यांना शांतीनिकेतन येथे ऐकलं होतं. त्यामुळे इंदिरा गांधींनी नागार्जून यांना तुम्हीही चला, बाबांचा जन्मदिन आहे असं म्हटलं. तरुण नागार्जून यांनी इंदिरा गांधींना म्हटलं की, इंदू तुझे वडील माझी कविता ऐकू शकणार नाहीत. तेव्हा इंदिरा गांधींनी नागार्जून यांना सांगितलं की, माझे वडील सर्व स्वीकार करतील, तुम्ही चला.बच्चनजींनीही नागार्जून यांना चला म्हटलं,” असं कुमार विश्वास सांगतात.

व्हिडीओ पाहा :

“गांधींचा दत्तक पुत्र असलेल्या नेहरूंसमोर तरूण कवी नागार्जून यांनी कविता वाचली”

कुमार विश्वास पुढे सांगतात, “नागार्जून नेहरूंच्या जन्मदिन कार्यक्रमात गेले. ज्या व्यक्तीला नासीर टीटो दोघेही सलाम करत होते, तो व्यक्ती ज्याला अमेरिका आणि रशिया दोघेही आपल्या गटात घेऊ इच्छित होते, तो व्यक्ती ज्याला गांधींचा दत्तक पुत्र म्हटलं जात होतं, तो व्यक्ती ज्याच्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक लास्की यांनीही प्रेम केलं, त्या व्यक्तीला समोर बसवून एक तरूण कवी नागार्जून यांनी कविता वाचली.”

‘वतन बेच कर पंडित नेहरू फुले नही समाते हैं…’

“‘वतन बेच कर पंडित नेहरू फुले नही समाते हैं, फिर भी गांधी के समाधीपर झुक झुक फुल चढाते हैं’. ही कविता नेहरूंनी ऐकली. आपल्या विरोधातील कविता ऐकल्यावर नेहरूंनी कवीच्या घरी ईडी, सीबीआय, पोलीस पाठवा असं म्हटलं नाही,” असं म्हणत विश्वास यांनी विरोधकांवर होणाऱ्या कारवायांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा : “केजरीवाल म्हणाले होते की एकतर ते पंजाबचे मुख्यमंत्री बनतील नाहीतर…” ; कुमार विश्वास यांचं खळबळजनक विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नेहरूंविषयी खोटी माहिती पसरवल्याने फरक पडत नाही”

“नेहरूंविषयी व्हॉट्सअॅपवरून हवी ती खोटी माहिती पसरवली तरी त्याने फरक पडत नाही. भारताला स्वातंत्र्यानंतर भाक्रा नांगल धरण, आयआयटी, आयआयएमचं स्वप्न देणारा व्यक्ती कोणाला आवडत नसेल, तर ती तुमची अडचण आहे, आमची अडचण नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.