देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, काल(मंगळवार) राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेला हिंसाचार धक्कादायक होता. या हिंसाचाराता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर झालंच शिवाय तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी  देखील जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिसांकडून हिंसाचारास कारणीभूत असलेल्यांचा शोध सुरू आहे. या दरम्यान दीप सिद्धू याच्याबरोबरच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना याचं नाव देखील समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्खा सिधाना व त्याच्या सहकाऱ्यांची सेंट्रल दिल्लीमध्ये घडलेल्या हिंसाचारात महत्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. आता दिल्ली पोलीस या दिशेने अधिक तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिल्ली पोलीस त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करत आहेत.  आंदोलनातील तरूणांना हिंसाचारासाठी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दीप सिद्धू हा भाजपाचा कार्यकर्ता, पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो आहे – राकेश टिकैत

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान हिंसाचार घडवून आणण्यात लक्खा सिधानाचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याविरोधात पंजाबामध्ये दोन डझन पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये हत्या, लुटमार, अपहरण, खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. याचबरोबर त्याच्याविरोधात शस्त्र कायद्य अंतर्गत खटला देखील सुरू आहे.

लक्खा सिंह सिधाना अनेकदा तुरूंगात देखील जाऊन आलेला आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात पुरावे ने आढळल्याने किंवा साक्षीदार न सापडल्याने तो आतापर्यंत बाहेर आलेला आहे. तर, काही दिवसांअगदोर लखनऊ महामार्गावरील एका इंग्रजी साईन बोर्डला काळं फासलं म्हणून त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती.

शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?

प्राप्त माहितीनुसार, लक्खा सिंह सिधाना आपली प्रतिमा बदलण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. यासाठी तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता असल्याचे दर्शवत आहे. पंजाबमध्ये मनप्रीत बादल यांच्या पक्षाकडून त्याने निवडणूक देखील लढवलेली आहे.

दरम्यान, काल ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील घुमटावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले होते. शेतकऱ्यांना चिथवण्यामागे कोण आहे याच शोध घेतला जात असताना, दीप सिद्धू व लक्खा सिंह सिधाना ही दोन नावं समोर आलेली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakha sidhanas name also in front in the delhi violence case msr
First published on: 27-01-2021 at 12:06 IST