पॉस्को प्रकल्पाला विरोध करणाऱ्या तीन कार्यकर्ते शनिवारी रात्री बॉम्ब तयार करताना मरण पावल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर ओडिशा सरकारने या मोठय़ा स्टील प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला नव्याने सुरुवात केली.
पोलिसांनी रविवारी घटनास्थळावरून तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणारा दारूगोळा तसेच धारदार पाती जप्त केली आहेत. पटाना गावात पॉस्को प्रतिरोध संग्राम समितीचे सदस्य बॉम्ब बनवत असताना झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती जगतसिंगपूरचे पोलीस अधिक्षक सत्यब्रता भोई यांनी सांगितले.
हा बॉम्ब पोलीस तसेच प्रकल्पाच्या समर्थकांवर हल्ला करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भोई यांनी केला. मात्र प्रकल्पविरोधी समितीने पोलिसांचा आरोप फेटाळला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाची परिसस्थिती निर्माण झाली आहे. मात्र पोलीस बंदोबस्तात पोस्को प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया पून्हा सुरु करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2013 रोजी प्रकाशित
पॉस्को प्रकल्पासाठी भूसंपादन सुरु
पॉस्को प्रकल्पाला विरोध करणाऱ्या तीन कार्यकर्ते शनिवारी रात्री बॉम्ब तयार करताना मरण पावल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर ओडिशा सरकारने या मोठय़ा स्टील प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला नव्याने सुरुवात केली.
First published on: 04-03-2013 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land acquisition process started for posco project