बायको आणि बहिणीसोबतच्या नात्यात जसा फरक असतो तसाच फरक गोमांसामध्ये आणि मटनामध्ये असतो,  असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीही वादग्रस्त वक्व्य करुन गिरीराज यांनी आपल्या पक्षाला अडचणीत आणले आहे.
‘हिंदू लोकही गोमांस खातात‘ अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. त्यावर काल नरेंद्र मोदींनी लालू यांनी संपूर्ण यदुवंशीयांचा अपमान केल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी लालू यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, जसे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पत्नी आणि बहिणीचे नाते वेगवगळे असते तसेच, गाईच्या आणि बक-याच्या मांसामध्ये अंतर असते असे ते यावेळी म्हणाले. बक-याचं मांस खाणा-या व्यक्तीला जर कुत्र्याचे मांस दिले तर ते खातील का? असेही त्यांनी म्हटले.