गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याबरोबरच त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करत तो गॅंगस्टर नेमका कसा बनला? याबाबतही माहिती दिली.

हेही वाचा – “सलमान खानने पैशांचं आमिष दाखवलं होतं, परंतु…”, धमकी देताना लॉरेन्स बिश्नोईचा मोठा दावा

“मला या तुरुंगानेच गॅंगस्टर बनवलं”

तो म्हणाला, “मी गॅंगस्टर होईल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. मी चंदीगड विद्यापीठात कायद्याचा विद्यार्थी होतो. मला परिस्थितीने गुंड बनवलं. महाविद्यालयीन काळात मी राजकारणातही सक्रीय होतो. त्यावेळी विरोधीगटातील विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून मी तुरुंगातच आहे. मला या तुरुंगानेच गॅंगस्टर बनवलं.”

हेही वाचा – सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने स्वत:च केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून आम्हाला चुकीच्या मार्गावर जावं लागलं”

“तुरुंगात काही गुंडांनी आमच्या काही सहकाऱ्यांची हत्या केली. पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला शस्र उचलावी लागली. सहकाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्हाला चुकीच्या मार्गावर जावं लागलं. आम्ही समाजात कोणतीही दहशत पसरवत नाही. आम्ही फक्त आमच्या सहकाऱ्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून करतो. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागेही हेच कारण होतं, कारण त्याने आमच्या सहकाऱ्यांना मारणाऱ्यांना मदत केली होती”, असेही तो म्हणाला.