गुजरात विधानसभा सचिवालयात रविवारी रात्री उशिरा एक बिबट्या घुसला. वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बिबट्या पकडण्यासाठी अभियान राबवले. यादरम्यान सचिवालय बंद ठेवण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी बिबट्या सचिवालयात घुसल्याचे दिसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अत्यंत संवेदनशील आहे. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मोठ्या महत्प्रयासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात संयुक्त पथकाला यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिवालयात मुख्यमंत्र्यांशिवाय सर्व मंत्र्यांचे कार्यालय आहे. ज्या इमारतीत बिबट्या घुसला ती इमारत सचिवालयाची मुख्य इमारत आहे. यादरम्यान पोलिसांनी विधानसभेतील सर्व मार्ग बंद केले होते. विधानसभेच्या बाहेर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. हे संयुक्त ऑपरेशन संपेपर्यंत आत जाण्याची कोणालाच परवानगी देण्यात आली नाही.

दरम्यान, सर्वांच्या सुरक्षिततेला महत्व दिले जात असल्याचे पोलीस अधीक्षक मयूर चावला यांनी सांगितले. जोपर्यंत बिबट्या पकडला गेला आहे किंवा तेथून निघून गेला असल्याचे निश्चित होत नाही. तोपर्यंत कोणालाच आत जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard entered secretariat premises in gujarats gandhinagar
First published on: 05-11-2018 at 11:20 IST