जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कराच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत ‘लष्करे तैय्यबा’ या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक कमांडरला ठार मारण्यात यश आले. मुहम्मद अफझल ऊर्फ तालिब असे या दहशतवाद्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. त्यानंतर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही यश आले होते.
पुलवामा जिल्ह्यातील अस्तान मोहल्ला भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराच्या जवानांना मिळाल्यावर या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आल्यानंतर त्याला जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामध्येच अफझल ठार झाला. यानंतर दहशतवादी आणि जवानांमध्ये काहीवेळ चकमक सुरूच होती. गेल्या वर्षापासून अफझल या भागात लष्करे तैय्यबासाठी कार्यरत होता. सुरक्षा दल अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते.
दरम्यान, या घटनेनंतर या भागात दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2015 रोजी प्रकाशित
काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कराच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत 'लष्करे तैय्यबा' या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक कमांडरला ठार मारण्यात यश आले.

First published on: 06-08-2015 at 07:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Let district commander killed in fresh gunfire in pulwama