हरिद्वारमधील रेल्वेस्थानक आणि मंदिरे उडवून देण्याची धमकी देणारे पत्र लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने हरिद्वारमधील अधीक्षकांना पाठविण्यात आले आहे. येत्या २९ डिसेंबरला रेल्वेस्थानक उडवून देण्याची धमकी पत्रामध्ये देण्यात आलीये.
हरिद्वारमधील रेल्वेस्थानकाचे अधीक्षक गोपाळकृष्ण दास यांना हे पत्र मिळाले आहे. लष्करे तोयबाचा कमांडर असल्याचे सांगणारा करिम अन्सारी नावाच्या युवकाने हे पत्र पाठवले आहे. पत्रामध्ये रेल्वेस्थानक आणि शहरातील मंदिरे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र रेल्वेच्या अधिकाऱयांनी पोलीसांकडे दिले असून, पोलीसांनी संबंधितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याआधीही हरिद्वारमधील रेल्वेस्थानक उडवून देण्याची धमकी देणारे पत्र अधीक्षकांना मिळाले होते. या पत्रावरील पोस्टाचा शिक्का स्पष्ट दिसत नसल्यामुळे ते नेमके कोठून आले, याची माहिती पोलीसांना मिळू शकलेली नाही.