येथून २५ किमी अंतरावर असलेल्या संबळ परिसरातील मरकंडल खेडय़ात पहाटे लष्कराच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्कराने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागल्याचे सांगितले. संबळकडे जाताना यासिन मलिकसह पाच फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फुटीरतावाद्यांनी सोमवारी काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.
ही घटना दुर्दैवी घटना असल्याचे उच्च शिक्षणमंत्री मोहम्मद अकबल लोन यांनी सांगितले. इरफान अहमद गनई आणि इर्शाद अहमद दर अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. एका तरुणाच्या हत्येत लष्कराचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तर दुसऱ्या घटनेत लष्कराची रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला त्या वेळी लष्कराने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हा तरुण मृत्युमुखी पडला. जेकेएलएफचा चेअरमन यासिन मलिकसह पाच फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मलिकसह शौकत अहमद बक्षी, बशीर अहमद काश्मीर, शाहीद मकया आणि जावेद अहमद मिर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
फुटीरतावाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात आज बंद
येथून २५ किमी अंतरावर असलेल्या संबळ परिसरातील मरकंडल खेडय़ात पहाटे लष्कराच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्कराने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागल्याचे सांगितले. संबळकडे जाताना यासिन मलिकसह पाच फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फुटीरतावाद्यांनी सोमवारी काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.
First published on: 01-07-2013 at 07:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life affected in kashmir valley as separatists call bandh