ब्राझिलमधील रिओ द जानेरिओमधील येशू ख्रिस्ताच्या पूतळ्यावर वीज कोसळल्याने हानी झाली. वीज कोसळल्याची दृश्ये अतिशय अद्भूत आणि आश्चर्यकारक आहेत.
रिओ द जानेरिओमधील कोरकोवाडो पर्वताच्या शिखरावर हा ३० मीटर उंचीचा पुतळा गेली अनेक वर्षे उभा आहे. याआधीही नैसर्गिक आपत्तीमुळे या पुतळ्याचे नुकसान होत आहे. परंतु, यावेळी या पुतळ्याची मोठी हानी झाली.

वीजेच्या तडाख्याने पुतळ्याच्या उजव्या हाताची हानी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी वीज कोसळून या पुतळ्याच्या मधल्या बोटाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. वीज कोसळण्याच्या संरक्षणासाठी पुतळ्यावर लाईटनिंग रॉड यंत्रणाही बसविण्यात आली आहे. तरीसुद्धा या पुतळ्यावर वीज कोसळली आणि तेही दोनवेळा.
वीज एकाच ठिकाणी दोनवेळा कोसळत नाही असे म्हणतात परंतु, या पुतळ्याच्या बाबतीत तसे झाले असल्याचे तेथील ख्रिस्त धर्मगुरू म्हणाले.
हवामानात सुधार झाल्यानंतर पुतळ्याची डाग़डुजी करण्यात येणार असल्याचेही पुतळ्याचे देखभाल करणाऱयांनी सांगितले.