पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी सर्वार्थाने योग्य आहेत, असे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले. गेल्या पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा सिन्हा यांनी मोदींबाबत भाजपच्या भूमिकेच्या विरोधी सूर आळवला आहे.
अडवाणी यांचे भाजपसाठी बहुमोल योगदान आहे. त्यांची कारकीर्द उत्तम आहे. पक्षात त्यांच्यापेक्षा पंतप्रधानपदासाठी चांगला दावेदार असू शकत नाही, असे सिन्हा यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. तर लोकप्रियता हा निकष लावायचा झाला तर अमिताभ बच्चन हे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असा टोला त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना लगावला. मोदी सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे राजनाथ सिंह वारंवार सांगत आहेत. मोदी उत्तम प्रशासक आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे त्यांनी उत्तम कारभार केला आहे, असे सिन्हा यांनी दुसऱ्या एका उत्तरात सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2013 रोजी प्रकाशित
पंतप्रधानपदासाठी अडवाणीच योग्य-शत्रुघ्न सिन्हा
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी सर्वार्थाने योग्य आहेत, असे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले.
First published on: 03-08-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lk advani best pm candidate shatrughan sinha