अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर लोकसभेसाठी पुन्हा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी शुक्रवारी त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, ही निवडणूक भाजप पक्षाची नाही तर भारताची आहे, हे मतदारांना सांगा.

शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह शहरातील गुरुकुल रोडवरील मंदिरात हनुमानाची पूजा केली आणि त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सर्व मतदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

शहा यांनी आपल्या राजकारणातील सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, जवळपास ३० वर्षांपूर्वी मी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती, त्याच हनुमान मंदिरात पूजा करून मी निवडणूक प्रचार सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरांशी कठोरपणे सामना करून संपूर्ण देशाला केवळ समृद्धच नाही तर सुरक्षितही केले आहे. या लोकसभा निवडणुकीचा मुख्य मुद्दा भारताला महान बनवण्याचा आहे असे ते म्हणाले.