जाणून घ्या कोण आहेत जेफ बेझोस यांना मागे टाकणारे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  

अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती १९८.९ अब्ज डॉलर आहे.

Bernard Arnoult
बर्नार्ड अर्नाल्ट बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

लूई विटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय. फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलिनेयर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव सर्वात वर आहे. अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती १९८.९ अब्ज डॉलर आहे. तर जेफ बेझोस १९४.९ अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क १८५.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

बर्नार्ड अर्नाल्ट हे ७२ वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रांड लूई विटॉन मोएट हेनेसीचे मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याजवळ एकूण ७० ब्रांड्स आहेत. त्यामध्ये लुई वीटन, मार्क जॅकब्स, केंजो, स्टेला मेकार्टनी फेंडी, क्रिश्चियन डायर, गिवेंची, सेफोरा यांसारख्या फेमस ब्रांडचा समावेश आहे.

बर्नार्ड अर्नाल्ट यांनी वडिल जीन लिओन अर्नाल्ट यांच्या मालकीच्या फेरेट-साविनेल यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर 1978 ते 1984 या काळात त्यांनी वडिलांच्या कंपनीचे नेतृत्व देखील केले. ते १९८९ पासून LVMH कंपनीचे प्रमुख आहेत.

बर्नार्ड यांनी दोनदा लग्न केले असून त्यांना पाच मुलं आहेत. अॅने डेव्हरिन यांच्यासोबतच्या लग्नापासून त्यांना डेल्फाइन आणि अँटोनी नावाची मुलं आहेत. त्यांनी दुसरं लग्न १९९१ मध्ये कॅनेडियन कॉन्सर्ट पियानो वादक हेलिन मर्सियरशी केले. त्यांच्यापासून त्यांना अर्नाल्ट आणि मर्सियर यांना अलेक्झांड्रे, फ्रेडरिक आणि जीन अशी तीन मुलं आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Louis vuitton owner bernard arnoult is the richest man in the world hrc

ताज्या बातम्या