या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुदानित इंधन आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व श्रेणींसाठी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गुरुवारी सिलिंडरमागे २५ रुपयांनी वाढवण्यात आली. नैसर्गिक वायूच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ होत असताना या महिन्यात पाठोपाठ झालेली ही तिसरी दरवाढ आहे.

या वाढीमुळे, दिल्लीत १४.२ किलोग्रॅम वजनाचे सिलिंडर सध्याच्या ७६९ रुपयांऐवजी ७९४ रुपये झाली असल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसह सर्व श्रेणींकरता ही वाढ लागू झाली आहे.

स्वयंपाकाचा गॅस एकाच दरात, बाजारभावाने देशभर उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांना सरकार थोडी रक्कम अनुदान म्हणून देते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दरवाढीमुळे महानगरे आणि मोठय़ा शहरांमध्ये हे अनुदान नाहीसे झाले आहे. त्यामुळे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये ग्राहकांना काहीही अनुदान मिळत नाही आणि सर्व एलपीजी ग्राहकांना बाजारभावाने ७९४ रुपये मोजावे लागतात. डिसेंबरपासूनच गॅसच्या किमती वाढत असून, तेव्हापासून सिलिंडरमागे १५० रुपयांनी वाढ झाली आहे.

फक्त फेब्रुवारीत..  घरगुती गॅसच्या किमती फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा ४ तारखेला २५ रुपयांनी, तर १५ तारखेला ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता किंमतीत आणखी वाढ झाल्याने एकाच महिन्यात घरगुती गॅसची किंमत १०० रुपयांनी वाढली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg is another rs 25 more expensive abn
First published on: 26-02-2021 at 00:27 IST