भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा महासंगणक पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे तयार होणार आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वदेशी महासंगणकासाठी सरकारने ४५०० कोटींचा कार्यक्रम गेल्या मार्चमध्ये मंजूर केला आहे. पहिला परम महासंगणक तयार करणाऱ्या सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्वदेशी महासंगणकाचा प्रकल्प चालू आहे. सरकारने महासंगणनाचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यात एकण ८० महासंगणक येत्या सात वर्षांत तयार केले जाणार आहेत. काही महासंगणक आयातही केले जाणार आहेत. बाकीचे आपल्या देशात तयार करण्यात येतील. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले, की पहिला महासंगणक ऑगस्ट २०१७ मध्ये पूर्ण होईल. महासंगणकात जास्त उष्णता तयार होते ती कमी कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. हा महासंगणक चालवण्यासाठी लागणाऱ्या विजेचा खर्चच १००० कोटी असणार आहे. देशातील वेगवेगळ्या संस्था या महासंगणकाच्या मदतीने हवामान अंदाज, हवामान प्रारूपे तयार करणे, औषधे तयार करणे यासारखी कामे करू शकतील, असे आशुतोष यांनी सांगितले.
सध्या जगात अमेरिका, चीन, जपान, युरोपीय समुदाय यांच्याकडे जास्त सक्षम महासंगणक आहेत. स्वदेशी बनावटीचा महासंगणक हे पंतप्रधान मोदी यांचे मेक इन इंडिया कार्यक्रमातील स्वप्न असून विज्ञान व तंत्रज्ञान विभाग त्यासाठी काम करीत आहे.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री