रायपूर : मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली. जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ विष्णूदेव साय यांनी, तर अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

हेही वाचा >>> मोठी बातमी! भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली; नौदलातील तरुणाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य प्रदेश येथील शपथविधी सोहळा भोपाळ येथील लाल परेड मैदानावर झाला. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी ५८ वर्षीय यादव यांना ही शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी, नड्डा आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यावेळी उपस्थित होते. जयपूर : राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी होणार आहे. भजनलाल शर्मा मुख्यमंत्रिपदाची तर दियाकुमारी व प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्रिपदाची  शपथ घेतील.